• A
  • A
  • A
सरपंचांनीच प्रजासत्ताक दिनी दिल्या गावकऱ्यांना शिव्या

उस्मानाबाद - लोहारा तालुक्यातल्या हिप्परगा(रावा) गावातील ग्रामसभेदरम्यान सरपंचाकडून गावकऱ्यांना शिव्या देण्यात आल्या. दरम्यान प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवल्यानंतर ग्रामसभा भरवली जाते. त्यावेळी हा प्रकार घडला.


ग्रामसभेच्या निमित्ताने हिप्परगा गावातील गावकरी सरपंचाला व ग्रामसेवकाला प्रश्न विचारत होते. या दरम्यान, सरपंच व त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्याने प्रश्न विचारणाऱ्यांनाच शिव्या दिल्या. सरपंच राम मोरे यांनी गावातील्या जागेचा गैरव्यवहार केला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यांनी गावकऱ्यांची दिशाभूल करत प्रत्येकी २५०० ते ८००० रुपये घेतले. या बद्दल ग्रामसभेत काही लोकांनी जाब विचारला. दरम्यान, पैसे घरपट्टी व नळपट्टीचे घेतल्याचे सांगत सरपंचांनी वेळ मारून नेली. परंतु, ग्रामस्थांनी ही पावती घरपट्टी व नळपट्टी याप्रमाणे न देता जागा नावावर करून देण्यासाठीची असल्याचे सांगितले. यानंतर बिथरलेल्या सरपंचाने व त्याच्या साथीदारांनी प्रश्न विचारणाऱ्या गावांना अश्लील शिव्या दिल्या.
हेही वाचा - सहाव्या रांगेतून थेट पहिल्या रांगेत.., नरमलेल्या भाजपने केलं राहुल गांधींचं प्रमोशन?
नळपट्टी व घरपट्टीसाठी पैसे घेतले असल्यास त्याची पावती लगेचच देणे गरजेचे असते. मात्र, सरपंचाने असे न करता पैसे घेतले व हे पैसे घेतल्याचे कुठलीच नोंद दप्तरी करून घेतली नाही. त्यावेळी जनतेकडून विचारण्यात आलेल्या जाब व केलेला भ्रष्टाचार अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पैसे परत करतो, अशा पद्धतीचे टोलवाटोलवी चे उत्तर सरपंचाकडून देण्यात आले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES