• A
  • A
  • A
जिल्ह्यातील साठवण तलावात अत्यल्प पाणीसाठा

उस्मानाबाद - जिल्ह्यातील २२३ विविध लहान- मोठ्या साठवण तलावामध्ये केवळ ८ टक्केच पाणीसाठा उरला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना येत्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे.


हेही वाचा - बीडच्या बेदरवाडीची चित्तरकथा; निधनानंतरही सोसाव्या लागतायेत टंचाईच्या...
जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी व सिंचनासाठी मध्यम, लघु प्रकल्प तसेच साठवण तलावांचा मोठा आधार आहे. जिल्ह्यातील बहुतांश पाणी पुरवठ्याच्या योजना यावरच सुरू असतात. पावसाळ्यात जिल्ह्यातील सर्वच तलाव भरून वाहिले तरच ग्रामीण व शहरी भागातही पाण्याचा पाण्याची कमतरता भासत नाही. मात्र या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धरणे भरले नाहीत, त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - हिंगोलीत भीषण पाणी टंचाई; दहा रुपयात फक्त दोन हंडे पाणी!
उमरगा तालुक्यातील धरणाच फक्त भरले होते. जिल्ह्यातील सर्वच धरणाची क्षमता ७००.६२७ दलघमी आहे. मात्र, यावर्षी जिल्ह्याची ७७०.७ मिलीमीटर पावसाची सरासरी असताना केवळ ४४५.४० म्हणजेच ५७.७९ टक्के पाऊस झाला आहे. यामुळे तलावात पाणी आले नाही. आता उन्हाची तीव्रता जशी वाढेल तसे धरणातील पाणी झपाट्याने कमी होते.
हेही वाचा - पाणी टंचाईच्या समस्येने ग्रस्त संतप्त महिलांचा पालकमंत्र्यांना घेराव

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES