• A
  • A
  • A
समाज कल्याण सभापतीच्या सरकारी गाडीची काच काळी; कारवाई कोण करणार?

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती चंद्रकला भीमराव नारायणकर यांच्या गाडीची काच पूर्णपणे काळी आहे. चंद्रकला नारायणकर या सभापती असल्याने त्यांना महाराष्ट्र शासनाची गाडी असून त्यांचा गाडीचा क्रमांक एम.एच. २५ सी. ६५२३ आहे. सरकारी चारचाकी गाडीला गॉगल ग्लास असणे कायद्याने गुन्हा आहे.


विशेष म्हणजे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गाडीच्या काचा पारदर्शक आहेत. मात्र, सभापती नारायणकर बिनधास्तपणे काळे काच असलेली सरकारी गाडी वापरतात. चंद्रकला नारायणकर या शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. मात्र, बंडखोरी करुन त्यांनी राष्ट्रवादीला साथ देत स्वतः च्या गळ्यात सभापतीची माळ घातली. जि.प. सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर नारायणकर यांच्या कुटुंबातील सदस्यांवर वारंवार वेगवेगळे आरोप झाले आहेत.


सभापती नारायणकर यांच्या पती आणि मुलावर वीज चोरी केली, म्हणून कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या मुलावर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरला दारू पिऊन मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. आता सभपतींचा हा वेगळा करारनामा समोर आला आहे. त्या महाराष्ट्र शासन लिहिलेल्या गाडीच्या काचा पूर्णपणे काळ्या करून गाडी वापरत आहेत. विशेषतः चारचाकी गाडीच्या काचा पारदर्शक असायला हव्यात, असे न्यायालयाचे निर्देश आहेत.

सध्या जिल्ह्यात हेल्मेट सक्ती, बेशिस्त वाहन पार्किंग, वाहतुकीस अडथळा करणाऱ्या आणि निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालविले, म्हणून शेकडो गुन्हे सर्वसामान्य वाहनचालकांवर दाखल होत आहे. मात्र, समाज कल्याण सभापती महोदयांच्या काळ्या काचा असलेल्या गाडीवर कोणीच कारवाई करत नाही.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES