• A
  • A
  • A
'टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील'

नांदेड - राज्य सरकार दुष्काळग्रस्तांना दिलासा देणारे अनेक महत्वाचे निर्णय घेत असून टंचाईग्रस्त गावांना मदत देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. अशी ग्वाही राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. जिल्ह्यातील बिलोली व देगलूर उपविभागातील पाणीपुरवठा व दुष्काळी परिस्थितीसंदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.


यावेळी बोलतांना खोत म्हणाले, टंचाई काळात गावातील नागरिकांच्या हाताला कामाची गरज, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांना चाऱ्याची गरज असते. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपल्यास्तरावर निर्णय घेऊन तातडीने कामे पूर्ण करावीत. टंचाई काळात उपाय योजनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा व विभागस्तरावर दिले आहेत.

हेही वाचा- परभणीत दिव्यांगांच्या शिबिरात दोन हजार पाचशे रुग्णांची तपासणी

या बैठकीला आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, डॉ. मिनलताई खतगावकर, पंचायत समिती सभापती बोधणे, विशेष कार्य अधिकारी मधु गिरगावकर, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तहसिलदार विक्रम राजपुत आदींची उपस्थिती होती.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES