• A
  • A
  • A
नांदेडमध्ये एसी कोचेसची अज्ञातांकडून नासधूस; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

नांदेड - राजधानी एक्स्प्रेसच्या धर्तीवर सचखंड एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला ३ नवीन कोचेस बसविले जात आहेत. मात्र, तांत्रिक कारणामुळे हे ३ हमसफर कोचेस वापराविना यार्डात महिनाभरापासून बेवारस स्थितीत उभे करून ठेवले आहेत. या कोचेसकडे रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणेचे लक्ष नसल्यामुळे अज्ञातांनी या कोचेसच्या काचा फोडून नासधूस केली आहे. विशेष म्हणजे या तोडफोडीची रेल्वे विभागाने अद्यापही दखल घेतलेली नाही.


हेही वाचा - पुण्यातील एल. अँड टी. कंपनीतील कामगारांचे उपोषण सुरूच, एकाची प्रकृती खालावली

नांदेड विभागाला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या सचखंड एक्स्प्रेस या गाडीला नवीन कोचेस बसविले जात आहेत. यापूर्वीच काही रॅक बदलण्यात आले आहेत. यात आणखी ३ नवीन हमसफर एसी कोचेस नांदेड विभागात दाखल झाले आहेत. एसी जनरेटर रॅक उपलब्ध नसल्याने हे कोचेस वापराविना लालवाडी यार्डालगत नवीन ट्रॅकवर उभे करण्यात आले आहेत. डॉक्टर लेनच्या बाजूने कोणतीही संरक्षक भिंत या बॅरिकडे नसल्याने रेल्वे रुळावर नागरिकांचा मुक्त वावर असतो. यादरम्यान, अज्ञातांनी एसी रॅक क्रमांक १८८१२२९/सी सह अन्य २ डब्याच्या काचा फोडल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - जातीचं नाव काढणाऱ्यांना मी ठोकून काढेन - नितीन गडकरी

दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय नांदेड येथे आहे. तख्त सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी हजारो प्रवासी दररोज रेल्वेने नांदेड शहरात दाखल होतात. सिकंदराबाद-मनमाड मार्गावरील महत्वाचे स्थानक असलेल्या नांदेड रेल्वेस्थानकाचा विकास 'मॉडेल स्थानक' म्हणून करण्यात आला आहे. मात्र, या तोडफोडीच्या घटनेची रेल्वे विभागाने अद्यापही दखल घेतलेली नसल्याचे उघड होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ट्रॅकची आणि डब्यांची योग्य देखभाल करणे गरजेचे आहे. ट्रॅकच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्यास संभाव्य अपघात अथवा घातपात टळू शकतात. तसेच, कोट्यावधीची संपत्ती अज्ञातांकडून सुरक्षित ठेवणे शक्य होईल.

हेही वाचा - मॉयलचे सीएमडी राष्ट्रपतींपेक्षा मोठे? सरळ करावे लागेल, गडकरींचे खडेबोलCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES