• A
  • A
  • A
देशाच्या प्रगतीसाठी युध्द नव्हे, तर बुध्द पाहिजे - सत्यपाल महाराज

नांदेड - सध्या देशात जाती आणि धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती तोंड वर काढत आहेत. देशात सर्वत्र अराजकता माजली आहे. अशा परिस्थितीत देशाच्या प्रगतीसाठी युध्दाची नाही, तर तथागत गौतम बुद्धाच्या शांती, समता आणि सहिष्णुतेच्या विचाराची गरज असल्याचे मत सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनी केले. ते नांदेडातील तपोवन बुध्दभूमीतील बौध्द धम्म परिषदेत प्रवचन करताना बोलत होते.


या धम्म परिषदेत एकूण १६ ठराव पारित करण्यात आले. लहान परिसरातील तपोवन बुध्द भुमीच्या माळटेकडीवर ९ फेब्रुवारीला सत्यपाल महाराज यांच्या "सत्यपालची सत्यवाणी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी मंचावर भदंत सत्यानंद थेरो, भदंत सत्यानंद थेरो, भदंत पय्यारत्न, भदंत पय्याश्री, भदंत पय्यारत्न भदंत शिलरत्न, भदंत संघपाल, भदंत सुभुती यांच्यासह देशविदेशातील भिक्खु संघाकडून पवित्र धम्मदेशना देण्यात आली. तर सत्यपाल महाराज यांनी आपल्या प्रवचनातून दारूबंदी, हुंडाबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार, जादूटोणा, फसवा फसवी, बुवाबाजी, अस्पृश्यता, अंधश्रध्दा यावर कडाडून टीका करत तरुणांना व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला दिला. लग्नाआधी जय हनुमान आणि लग्नानंतर जय श्रीराम असे चारित्र्य संपन्न जीवन जगण्याचेही त्यांनी तरुणांना आवाहन केले. यावेळी हजारो तरुण व महिला-पुरूषांनी त्यांच्या या कार्यक्रमासाठी भरभरून दाद दिली.

हेही वाचा- टाळ्या वाजवून पैसे मागण्यापेक्षा आत्मनिर्भर होऊन स्वाभिमानाने जगा, न्यायाधीश मेहेरे यांचा सल्ला

दोन दिवस चाललेल्या या १६ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. एकूण १६ विविध प्रकारचे ठराव पारीत करण्यात आले. यात प्रामुख्याने तपोवन बुध्दभूमीला 'क' दर्जा तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून मान्यता मिळवून दिल्याबद्दल शासनाच्या अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला. तसेच बुध्दगयेचे महाविहार बुध्दाच्या ताब्यात देणे, पालीभाषेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे, देशातील सर्व बौध्द धम्म क्षेत्रास संरक्षण देणे, देशातील सर्व अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचा संपूर्ण खर्च शासनाने करावा, यासह अन्य १६ विविध ठराव पारित करण्यात आले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES