• A
  • A
  • A
टाळ्या वाजवून पैसे मागण्यापेक्षा आत्मनिर्भर होऊन स्वाभिमानाने जगा, न्यायाधीश मेहेरे यांचा सल्ला

नांदेड - टाळ्या वाजवून आणि अंगविक्षेप करून पैसे मागण्यापेक्षा आत्मनिर्भर होऊन स्वाभिमानाने जगा, असा सल्ला जिल्हा सत्र न्यायाधीश संजय मेहेरे यांनी तृतीय पंथीयांना दिला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (स्वारातीम) आणि अमेझ ग्रुप यांच्यावतीने तृतीय पंथीयांसाठी घेण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात संजय मेहेरे बोलत होते.


तृतीयपंथी आजही समाजापासून लांब आहेत. तसेच त्यांचे मूलभूत अधिकार व गरजा या जाणिवेतून समाजात सामावून घेण्यासाठी अमेझ ग्रुपच्या ज्योती जैन यांची संकल्पना घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश मेहेरे बोलताना म्हणाले, की तृतीयपंथी लोकांचे अंत्यसंस्कार फार वेगळ्या पद्धतीने केले जातात. यासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी यावेळी गुरू माँ यांच्यातर्फे करण्यात आली. स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही यावेळी मेहेरे यांनी दिले.

हेही वाचा - स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणबाजी करणारे म्हणतात मोदींना परिवार नाही - पंकजा मुंडे
तृतीय पंथीयांच्या अनेक समस्या आहेत. अजून आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. यावर डॉक्टर लोकांची एक टीम तयार करून त्यांची जबाबदारी डॉ. वैद्य यांच्यावर सोपवण्यात आल्याचे प्रा. उषा सरोदे यांनी सांगितले. तसेच हक्काच्या घरकुलासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे प्रा. सुलोचना मुखेडकर यांनी सांगितले. तृतीय पंथीयांच्या हक्कासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी सकाळचे संपादक माने यांनी दिले. तृतीय पंथीयांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम प्रथमच ठेवण्यात आला होता. त्यामुळे बदल घडवण्याच्या दृष्टीने हे एक पहिले पाऊल असल्याचे मत जिल्हा सेवा प्राधिकरणचे जिल्हा सचिव वसावे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - स्वरालीचे माहूर येथे जंगी स्वागत! तिला पाहण्यासाठी छोट्या मोठ्यांनी केली गर्दी!
या अनोख्या कार्यक्रमात स्वारातीमच्या विद्यार्थ्यांनी तृतीय पंथीयांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी एक नाटिका सादर केली. तृतीय पंथीयांना समाजात सामावून त्यांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी समाजातील सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे आवाहन अमेझ ग्रुपच्या ज्योती जैन, सुलोचना मुखेडकर, उषा सरोदे यांनी केले. कार्यक्रमास स्वारातीमचे प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच राधा गवारे, सुचित्रा भगत, चाईल्ड लाईनची टीम उपस्थित होती.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES