• A
  • A
  • A
ग्रामीण महिला खडतर परिस्थितीवर मात करुन मुलांना चांगल्या पदावर पोहोचवतात - पंकजा मुंडे

नांदेड - ग्रामीण भागातील महिला अतिशय खडतर परिस्थितीला सामोरे जातात. आपल्या कुटुंबाला सावरत, समाजात आपल्या मुलांना असामान्य पदावर पोहोचविण्याचे काम करतात, असे मत पंकजा मुंडे यांनी नांदेडमधील पुरस्कर वितरण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.


हेही वाचा-नांदेड : जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू
मुंडे पुढे म्हणाल्या, की ग्रामिण भागातील महिला कठिण परिस्थितीशी झुंज देत असामान्य कतृत्व गाजवतात. परंतु तुलनेने त्यांचा सन्मान होत नाही. मात्र, पवार दांपत्याने समाजातील हीच उणीव हेरून एका चारित्र्य संपन्न न्यायी राज्यकर्ती महिला अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने पुरस्कार देऊन महिलांचा गौरव केला आहे.

न्यु भारत मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या राजमाता अहिल्यादेवी महोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गोविंदराव केंद्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश प्रवक्ते अॅड. गणेश हाके, खासदार प्रितम मुंडे, माजी मंत्री सूर्यकांता पाटील, डॉ. माधवराव किन्हाळकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, संतुकराव हंबर्डे, प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख, माणिकराव लोहगावे, प्रविण पाटील चिखलीकर, गंगाराम ठक्करवाड, श्रावण पाटील भिलवंडे, दिलीपराव धर्माधिकारी उपस्थित होते.

नायगाव शहरातील पंकजा मुंडे यांच्या हस्ते राजेश पवार संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी मिराबाई वाघमारे, गोदावरी ढगे, लक्ष्मीबाई डोंगरे, धुरपताबाई कांबळे, विजया, सैलानी, तुळजाई, रमाई या ४ बचत गटांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गुरुप्रितकौर सोडी, दिलीपसिंग सोडी, राजश्री पाटील, धनश्री देव, देविदास राठोड, मारोती वाडेकर, संजय पवार, शंकरराव काळे, रामेश्वर गंदपवार, जयराम कदम, धनराज शिरोळे, शंकर कल्याण, सचिन पाटील बेंद्रीकर आदी उपस्थित होते. संयोजक राजेश पवार यांनी यावेळी प्रास्ताविक केले.
हेही वाचा-गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; ८ वर्षीय बालकाचा हात निकामीCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES