• A
 • A
 • A
नांदेडकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन; जिल्ह्यात २४ टक्के पाणीसाठा उपलब्ध

नांदेड - जिल्ह्यातील १०६ प्रकल्पात सध्या १६३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २४.१५ टक्के पाणीसाठी उपलब्ध आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. पाण्याचे येत्या ४ महिनाभराचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यात गत वर्षी कमी पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्पातही पाणीसाठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रकल्पात असलेल्या पाण्याचा साठा हळूहळू कमी होत चालला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पाणीटंचाईच्या संदर्भात आढावा बैठक घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले असून बेकायदा पाण्याचा उपसा करणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा - नांदेड : जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू
नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी आणि मानार प्रकल्पातील २ मोठे प्रकल्प, ९ लघू प्रकल्प, ३ उच्च पातळी बंधारे, ८८ लघू प्रकल्प आणि ४ कोल्हापुरी बंधारे असे एकूण १०६ प्रकल्पात पूर्णजल क्षमता २३८.९९ दलघमी; तर उपयुक्त पाणीसाठा १६३.१० दलघमी इतका आहे. मागील आठवड्यात उपयुक्त पाणीसाठा १७३.०६ दलघमी एवढा होता. तो जवळपास १० दलघमीने कमी झाला आहे. गेल्या वर्षी उपयुक्त पाणीसाठा १७६.६८ दलघमी, म्हणजेच २६.१६ टक्के होता.
हेही वाचा - गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; ८ वर्षीय बालकाचा हात निकामी
विविध प्रकल्पात शिल्लक पाणीसाठा -

प्रकल्प संख्या टक्केवारी
 • विष्णुपुरी १ ४१.३५
 • मनार १ २६.९२
 • म. प्रकल्प ९ १६.८५
 • उ.पा. बंधारे ३ २१.८८
 • लघू प्रकल्प ८८ २२.६४
 • कोल्हापुरी बं. ४ शून्य


जिल्ह्यालगत इतर प्रकल्प -

 • येलदरी - शून्य
 • सिद्धेश्वर - २०.३७
 • इसापूर - ३७.६८
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES