• A
  • A
  • A
नांदेड : जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू

नांदेड - केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने २०१९ मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात ६ ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.


शेतकरी बांधवांनी तूर नोंदणीसाठी येताना सोबत ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला ७/१२, आधार कार्ड झेरॉक्स व आधार लिंक असलेल्या बँक पासबूकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.
हेही वाचा- गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; ८ वर्षीय बालकाचा हात निकामी
या ठिकाणी होईल नोंदणी

नांदेड तालुक्यात नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती संगणक विभाग नवामोंढा नांदेड. मुखेड तालुका खरेदी विक्री संघ संस्था, तालुका खरेदी-विक्री संघ मुखेड यांचे कार्यालय. देगलूर- पूर्वारेश्वर अॅग्रो प्रोड्यूस कं. ली. करडखेड संस्था, आर्य समाज मंदिर रोड जुनी तहसील जवळ देगलूर. भोकर तालुका खरेदी विक्री संघ संस्था, खरेदी-विक्री संघ कार्यालय भोकर. नायगाव- कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव कार्यालय. किनवट-तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट, कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट कार्यालय या ठिकाणी नोंदणी होईल.
हेही वाचा- मुखेड येथे उपजिल्हा रुग्णालयात आग, २ महिला रुग्ण जखमी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES