• A
  • A
  • A
गेम खेळताना मोबाईलचा स्फोट; ८ वर्षीय बालकाचा हात निकामी

नांदेड - मोबाईलवर गेम खेळताना स्फोट झाल्याने ८ वर्षीय मुलाला आपला हात गमवावा लागल्याची घटना घडली आहे. रविवारी जिल्ह्यातील जिरगा (ता. मुखेड) गावात हा प्रकार घडला.

संपादित छायाचित्र


मुखेड तालुक्यातील कमलातांडा जिरगा तांड्यावरील श्रीपत जाधव या शेतकऱ्याने टि.व्ही. वरील जाहिरात पाहून मोबाईलची ऑनलाइन मागणी केली. आय कॉल के ७२ (I KALL k72) ही कंपनी १ हजार ५०० रुपयाला ३ मोबाईल त्यावर एक घड्याळ मोफत देत असल्याची जाहिरात होती.
हेही वाचा - धक्कादायक ! मोबाईलचा खिशातच स्फोट, घटना सीसीटीव्हीत कैद
या ३ मोबाईलपैकी एक मोबाईल गेल्या एक ते दिड महिन्यापासून वापरात होता. त्या मोबाईलवर त्यांचा मोठा मुलगा प्रशांत श्रीपत जाधव (वय ८) वर्ष हा नेहमीप्रमाणे गेम खेळत बसला असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. यामध्ये ज्या डाव्या हातात मोबाईल होता त्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे अक्षरशा उडून पडली. तर, मोबाईलचे तुकडे छातीला व पोटाला लागून तिथेही दुखापत झाली आहे.

हेही वाचा - चुकूनही करू नका या चुका, मोबाईलची बॅटरी होऊ शकते ब्लास्ट
या स्फोटात सुदैवाने वेळ हातावरच निभाऊन गेली. हात कायमचा निकामी झाला. त्या मुलावर बाऱ्हाळी येथिल डॉ. प्रविण गव्हाणे यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर उदगीर येथिल खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. हसण्या-खेळण्याच्या वयातच हात गमवावे लागल्याने कुटुंबीयांवर मोठा आर्थिक व मानसिक बोजा पडल्याचे कुटुबीयांचे म्हणने आहे. तर, एका तांड्यावरील शेतकरी कुटुंबातील मुलाला कायमचे अपंगत्व आले असल्याने बाऱ्हाळी परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES