• A
  • A
  • A
मुखेड येथे उपजिल्हा रुग्णालयात आग, २ महिला रुग्ण जखमी

नांदेड - मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या एका कक्षाला शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्ण आणि नातेवाईकाची धावपळ उडाली. या आगीमुळे दोन रुग्ण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


मुखेड येथे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आतील एका कक्षाला शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. यामुळे रुग्णालयात दाखल गरोदर माता आपल्या नवजात बालकांना घेऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होत्या. आगीच्या धुराचा त्रास नवजात शिशूंना होऊ लागल्याने महिला रुग्णांची आरडाओरड सुरू झाली होती. या घटनेची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि अधीक्षकांना देण्याच्या प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचे मोबाईल बंद होते. दरम्यान, दोन महिला रुग्णालयातच असल्याचे पाहून उपस्थित नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. आगीची झळ पोहोचलेल्या दोन महिलांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


हेही वाचा - ३५ लाखांच्या अंमली पदार्थांसह १३ जणांना अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

आग विझवण्यासाठी रुग्णालयात कुठलीही यंत्रणा नसल्याने स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरा आग आटोक्यात आणण्यात आली. रुग्णालय वाऱ्यावर सोडून निघून गेलेल्या वैद्यकीय अधीक्षक तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मोबाईल लागत नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. या गंभीर घटनेची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा - भाजपने बारामतीत उमेदवार उभा करावा; जनता योग्य निर्णय करेल, सुप्रिया सुळेंचा पलटवार
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES