• A
  • A
  • A
स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणबाजी करणारे म्हणतात मोदींना परिवार नाही - पंकजा मुंडे

नांदेड - स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणबाजी करणारे पंतप्रधान मोदींना परिवार नाही असे म्हणतात, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर बोचरी टीका केली. पंकजा नरसी येथील न्यु भारत शिक्षण प्रसासरक मंडळातर्फे आयोजित राजमाता अहिल्यादेवही महोत्सव पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर कडाडून टीका केली.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिवार नसल्याची टीका केली जाते. पण नरेंद्र मोदी यांचं कुटुंब ही जनता आहे. पुढे त्या बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. नांदेड जिल्ह्याला देशातील आणि राज्यातील सर्वोच्च पदे मिळाली पण नांदेड जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याचे पंकजा म्हणाल्या.
हेही वाचा - माझ्या वडिलांचे काही झाले असेल तर त्याचा जीव घेईन - पंकजा मुंडे

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES