• A
  • A
  • A
स्वरालीचे माहूर येथे जंगी स्वागत! तिला पाहण्यासाठी छोट्या मोठ्यांनी केली गर्दी!

नांदेड - माहूरची लेक 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमात महाविजेता ठरलेली गायिका स्वराली जाधव हिच्या स्वागतासाठी शनिवारी माहूर नागरी स्वरालीच्या जय जय कराने दुमदुमली. स्वरालीची एक झलक पाहण्यासाठी छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनीच गर्दी केली होती. स्वरालीचे शहरात आगमन होताच शहरभर विराट मिरवणूक काढून माहूर येथील नगर पालिकेच्या पटांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.


स्वराली सकाळी ११ ला माहूर शहरात दाखल होणार म्हणून पंचक्रोशीतील नागरिकांनी शाळकरी मुले व चाहते मंडळी आतुरतेने वाट पाहत होती. अखेर स्वराली दुपारी २ ला शहरात दाखल झाली. शहरात दाखल होताच फटाक्याची अतिषबाजी, ढोल ताश्याच्या गजरात खुल्या जीपमधून तिची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर नगरपालिकेच्या पटांगणात हजारोंच्या साक्षीने स्वराजी राजू जाधवचा सहकुटुंब सत्कार केला.
हेही वाचा - धम्म ज्ञानाचे आचरण करून जीवन सुखी करावे - अमिता चव्हाण
स्वराली गोवर रुबेलाची ब्रँड अँबेसिटर -


स्वराली माहूरसह महाराष्ट्राची भूषण आहे. तिला जिल्हापरिषद नांदेडकडून सन्मानित करून कृतज्ञता व्यक्त करावी, असा सल्ला आमदार प्रदीप नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला. यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी स्वरालीला गोवर रुबेला मोहीमेची ब्रँड अँबेसिटर म्हणून घोषित केले.
स्वरालीने गीत गाताच उपस्थितांनी केला टाळ्यांचा कडकडाट -
स्वरालीने सत्काराला उतर देताना 'सुर नवा ध्यास नवा' कार्यक्रमात महाविजेते पदासाठी अंतिम फेरीत गायलेले दमा दम मस्त कलंदर हे गीत गायले. तिचा आवाज निघताच उपस्थित स्वरालीच्या चाहत्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. गाणे संपताच चिमूकल्या मुलींनी स्टेजवर जाऊन स्वरालीला मिठी मारली. यावेळी हजारो लोकांची उपस्थिती होती.
हेही वाचा - तपोवन बुद्धभूमीत बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन, देशभरातील भिक्खू होणार उपस्थित
या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रदीप नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, तहसीलदार विजय अवधने ,मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या कदम, वन परिक्षेत्र अधिकारी कावळे, उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी, सभापती दतराव मोहिते, नगरसेवक राजेंद्र केशवे, रहमत अली, इलियास बावाणी, कृतज्ञा वरनगावकर, ज्योती कदम, शीतल जाधव, वनिता जोगदंड, मीना कोवे, प्रिया गांधेवाड, अश्विनी तुपदाळे, सुधा कपाटे, प्राध्यापक भगवान राव जोगदंड, प्राद्यापक लोने सर, वैजनाथ स्वामी, प्राध्यापक विनोद कांबळे, नीरधारी जाधव, मसूद खान, प्रकाश गायकवाड, किसन राठोड यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचालन एस. एस. पाटील यांनी तर आभार भाग्यवान भवरे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे आनंद तूपडाले, मनोज कीर्तने, प्रा. विलास भंडारे, संजय कांबळे, एस. एस. पाटील, भाग्यवान भवरे, प्राचार्य राजेंद्र लोणे, पत्रकार जयकुमार अडकीने, सरफराज दोसानी, राज ठाकूर, गजानन भारती, राजेश दीक्षित, आकाश कांबळे, विनोद कांबळे, प्रमोद राठोड यांनी अथक प्रयत्न केले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES