• A
  • A
  • A
महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीस अटक

नांदेड - मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांना चाकूने भोसकून लुटण्याचे काम करणाऱ्या टोळीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ८ फेब्रुवारीला रात्री साडेअकरा ते एक वाजेच्या सुमारास वेगवेगळ्या ३ घटना घडल्या होत्या. यात महामार्गावर वाहनधारकांना अडवून त्यांच्यावर शस्त्राने वार करून लुटण्यात आले होते.


वसमत रोडवर मालेगाव येथे रात्री साडेअकराच्या सुमारास मेट्रो बारसमोर भारत कांबळे (वय ३५, वासमत) हे वसमतकडे जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी कांबळेंची दुचाकी अडवली. तसेच त्यांना चाकूने जबर मारहाण केली आणि त्यांच्याजवळील ३ हजार रुपये काढून घेतले. कांबळे यांची हिरो डिलक्स दुचाकीही चोरट्याने पळवून नेली. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - पत्नी नांदत नसल्याने पतीची मुलांसह आत्महत्या, नांदेडमधील धक्कादायक घटना

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व अर्धापूर पोलिसांनी सोनूसिंग राजेंद्रसिंग चव्हाण (गुरुद्वारा गेट नं-१ पांचाली हॉटेल, नांदेड) याला त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता अमृतसिंग उर्फ अमऱ्या तरमसिंघ बडे (बक्षीवाडा, पंजाब) तसेच सुनील सुरेश सुलगेकर (बंदाघाट, नांदेड) यांचाही यामध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. शिवाय याच रात्री नांदेडकडे परत येताना प्रवीण यशवंत सावते (येळेगाव ता. अर्धापुर) यांनाही या तिघांनी मारहाण करून लुटले. तसेच रात्री एकच्या सुमारास टाटा शोरूमजवळ आणखी एका व्यक्तीला पोटावर चाकूने वार करून जबर मारहाण करत लुटल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. यातील दोन्ही आरोपींची पोलीस दप्तरी गुन्हेगार म्हणून नोंद आहे. अमृतसिंगविरुद्ध नांदेड तसेच अकोला जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा -नांदेड - दलित वस्तीचा निधी रोखणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा इशारा
संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे उपविभागीय पोलीस अधीक्षक अभिजीत फसके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. भारती यांच्या पथकाने केली.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES