• A
  • A
  • A
धम्म ज्ञानाचे आचरण करून जीवन सुखी करावे - अमिता चव्हाण

नांदेड - धम्म परिषदेत येणाऱ्यांनी धम्म ज्ञानाचे आचरण करून आपले जीवन सुखी करावे. धम्म परिषदेच्या माध्यमातून तथागत गौतम बुध्दांचा धम्म प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मदत होते, असे मत आमदार अमिता चव्हाण यांनी व्यक्त केले. त्या १६ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी लहान (ता. अर्धापूर) येथील धम्म परिषदेत बोलत होत्या.


हेही वाचा - नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार अमिता चव्हाण!
अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे तपोवन बुध्दभूमित पूज्य भदंत कृपाशरण महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात सुरुवात झाली. यावेळी आमदार अमिता चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, महापौर शिला भवरे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीक यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. चव्हाण यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्धाटन करण्यात आले.

या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष संजय देशमुख लहानकर यांनी उपस्थित भिक्खू संघाचे आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. धम्म परिषदेचे संयोजक संजय लोणे यांनी प्रास्ताविक करून धम्म परिषदेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. सकाळी परित्राण पाठ, त्रिरत्न वंदना, धम्मध्वजारोहण आदी कार्यक्रम झाले. लोण ते तपोवन अशी धम्म मिरवणूक काढण्यात आली. या धम्म परिषदेचे सूत्रसंचालन शामराव लोणे यांनी केले. यावेळी तपोवन बुध्द विहाराचे उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा -नांदेड लोकसभेसाठी अमिता चव्हाण यांनाच उमेदवारी द्या, जिल्हा काँग्रेस...
यावेळी धम्मपीठावर पूज्य भदंत सत्यानंद थेरो, पूज्य भदंत सत्यानंद थेरो, पूज्य भदंत पय्यारत्न, पूज्य भदंत पय्याश्री, पूज्य भदंत पय्यारत्न पूज्य भदंत शिलरत्न, पूज्य भदंत संघपाल, पूज्य भदंत सुभुती यांच्यासह देश-विदेशातील विद्वान भिक्खू संघ उपस्थित होता.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES