• A
  • A
  • A
पत्नी नांदत नसल्याने पतीची मुलांसह आत्महत्या, नांदेडमधील धक्कादायक घटना

नांदेड - पत्नी नांदत नसल्याने निराश झालेल्या पतीने आपल्या दोन मुलांसह विष घेत जीवन संपवले आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात ही घटना आज उघडकीस आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


माहूर तालुक्यातील रामू नाईक तांडा येथील संतोष चव्हाण (वय 35) याची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. त्यामुळे संतोष वैफल्यग्रस्त झाला होता. याच तणावात संतोषने त्याची 12 वर्षीय मुलगी वेदिका आणि १० वर्षीय मुलगा रुपेश या दोघांना विषारी औषध पाजवून मारले. त्यानंतर त्याने स्वतःही औषध पिऊन आपले जीवन संपवले. मागील आठ दिवसांपासून त्याने मुलांना घेऊन गाव सोडले होते. त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली होती. अशातच आज दिनांक ९ फेबुवारी रोजी किनवट पोलीस ठाण्याला जंगलात तिन मृतदेह सापडल्याची बातमी मिळाली.

हेही वाचा - नांदेड - दलित वस्तीचा निधी रोखणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा इशारा

त्यावरून पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जंगलात मुलगी आणि मुलाचे प्रेत एकत्रच होते. तर, वडिलांचे प्रेत थोड्या दूर अंतरावर दिसले . तिन्ही प्रेताच्या जवळ आधार कार्ड मिळाले. त्यामुळेच मयतांची ओळख पटली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना तीन दिवसांपूर्वींची असू शकते. यात काही घातपाताचा प्रकार आहे का , याचा तपास पोलीस करत आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES