• A
  • A
  • A
नांदेड - दलित वस्तीचा निधी रोखणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा इशारा

नांदेड - जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या दलित वस्तीच्या ३९ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या १६५५ विकास कामांची यादी जाहीर होताच यासंदर्भात आलेल्या तक्रारीवरून सदरील विकास कामांना स्थगिती आदेश मिळाला आहे. हा प्रकार निंदनीय असून दलित वस्तीचा निधी रोखणाऱयांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार तक्रार देणार असल्याची माहिती मुखेडचे माजी नगरसेवक राहुल लोहबंदे यांनी दिली.


दलित वस्त्यांचा विकास करण्यासाठी दरवर्षी शासन कोट्यावधीचा निधी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून खर्च करते. या निधीच्या माध्यमातून दलित वस्ती अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम पाणीपुरवठा योजना, सांस्कृतिक सभागृह, विद्युतीकरण आदी विकास कामे केली जातात. यावर्षी नांदेड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने सर्व जिल्हा परिषद सदस्यांकडून वंचित दलित वस्त्यांचा आराखडा मागवला होता.
हेही वाचा- नांदेडमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर मनसेचे आंदोलन
ग्रामपंचायतीच्या मागणी व शासकीय निकषानुसार ३९ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या १६५५ कामास मंजुरी देण्यात आली होती. परंतु काही असंतुष्ट मंडळींनी सूडभावनेतून आडकाठी आणत स्थगिती आदेश काढण्यास प्रशासनास भाग पाडले. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून दलित वस्ती कामाच्या निधीला वारंवार स्थगिती आदेश काढण्यात येतो. त्यामुळे दलित वस्तीच्या विकास कामात ढवळाढवळ करणाऱ्या मंडळीवर कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेणार असल्याचे राहुल लोहबंदे यांनी सांगितले. याप्रकरणी वंचित समाजाच्या भावना तीव्र असल्याचे सांगत प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला.

हेही वाचा- वन विभागाच्यावतीने अवैध आरा मशीनवर छापे, लाकूड तस्करांचे धाबे दणाणले

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES