• A
  • A
  • A
नांदेडमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर मनसेचे आंदोलन

नांदेड - शेतकऱ्यांचे कृषी कर्ज पुनर्गठन न करणे, कर्ज न देणे, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली करणे, असे आरोप ठेवत मनसेने शुक्रवारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर आंदोलन केले. बँक प्रशासनाकडून आदेशाची पायमल्ली होत आहे, असे आरोप करण्यात आले आहेत.


हेही वाचा-राष्ट्रीय युवक महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने मिळवली ३ पारितोषिके
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. दुष्काळ जाहीर असताना, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली असतानाही शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली केली जात आहे. कर्जवसुलीच्या पावत्या दिल्या जात नाहीत. हा सर्व प्रकार शेतकऱ्यांची आर्थिक व मानसिक कोंडी करणारा आहे, या विरोधात मनसेने महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर आंदोलन केले.
बँकेच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन २ तास सुरू होते. बँकेच्या अधिकाऱ्यांना मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. बँकेने शेतकऱयांना त्रास दिल्यास नांदेड जिल्हा मनसे गप्प बसणार नसून पुढील काळात मनसे स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी नांदेड जिल्हा अध्यक्ष मॉन्टी सिंग जाहागीरदार, शहराध्यक्ष रसिक अब्दुल, मनसेचे जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष राजू पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा पाटील, गजानन चव्हाण, नांदेड जिल्ह्यातील मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
हेही वाचा-तपोवन बुद्धभूमीत बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन, देशभरातील भिक्खू होणार उपस्थित
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES