• A
  • A
  • A
राष्ट्रीय युवक महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने मिळवली ३ पारितोषिके

नांदेड - 'राष्ट्रीय युवक महोत्सव' १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान चंदीगड विद्यापीठ पंजाब येथे पार पडला. या महोत्सवामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने ३ पारितोषिके प्राप्त केली आहेत. वक्तृत्व स्पर्धेमध्ये किरण देशमुख, मिमिक्रीमध्ये सुमित हसाळे, तालवाद्यामध्ये हरिदास उमाटे आणि साथीदार संजय सोळंके यांनी उत्कृष्ट कलेचे सादरीकरण करून देशपातळीवर विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले आहे.


हेही वाचा - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवक महोत्सव...
या अगोदर पुणे येथे झालेल्या पश्चिम विभागीय युवक महोत्सवात विद्यार्थ्यांनी पारितोषिक प्राप्त केल्यामुळे त्यांची राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी निवड करण्यात आली होती. तालवाद्यामध्ये हरिदास उमाटे या विद्यार्थ्याने उत्तम सादरीकरण करून भारतातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे. त्यास संवादिनी वादक म्हणून संजय सोळंके या विद्यार्थ्याने साथ दिली. वक्तृत्व स्पर्धेमध्ये किरण देशमुख या विद्यार्थ्याने ‘भारत की सांस्कृतिक विरासत’ या विषयावर मुद्देसूद मांडणी करून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. विशेष बाब म्हणजे किरण देशमुख हा विद्यार्थी पुढील वर्षी होणाऱ्या दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पात्र ठरला आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी होण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे. मिमिक्रीमध्ये सुमित हसाळे या विद्यार्थ्याने विविध प्रकारच्या पक्षांचे, सिनेकलावंत आणि राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज काढून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे.

हेही वाचा - युवक महोत्सवात खूप शिकायला मिळाले, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
यासर्व विद्यार्थ्यांना डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ.संदीप काळे आणि शिवराज शिंदे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी विकास विभागामार्फत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करून संघाची पूर्वतयारी करून घेण्यात आली होती. आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव, राज्यस्तरीय युवक महोत्सव आणि पश्चिम विभागीय युवक महोत्सव असे अनेक टप्पे पूर्ण करून यश संपादन केल्याबद्दल कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी यशस्वी संघाचे कौतुक केले. या राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या यशाबद्दल कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवी सरोदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे, विद्यार्थी विकास संचालक डॉ.राजेश्वर दुडुकनाळे, क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम आदींनी अभिनंदन केले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES