• A
  • A
  • A
तपोवन बुद्धभूमीत बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन, देशभरातील भिक्खू होणार उपस्थित

नांदेड - अर्धापूर तालुक्यातील लहान परिसरात निसर्गरम्य तपोवन बुद्धभूमीच्या माळटेकडीवर शुक्रवारपासून सोळाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ होत असून, दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेला देश विदेशातील विद्वान बौद्ध भिक्खू व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


मागील पंधरा वर्षांपूर्वी या माळटेकडीवर कालवश दलितमित्र निवृतीराव लोणे यांनी अ. भा. बौद्ध धम्म परिषदेची सुरुवात केली. त्यानंतर आजपर्यंत अखंडित पणे येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जाते. आज मितीला ही धम्म परिषद सर्वदूर परिचित झाली आहे. त्यामुळे या बौद्ध धम्म परिषदेसाठी देशभरातून अनेक विद्वान भिक्खू व विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी ऊपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय रक्तदान शिबिर, मंगल परिणय व समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यावर्षी येथे भव्य दिव्य बुद्ध महाविहाराची निर्मिती करण्यात आली असून, सायंकाळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महाविहाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर सकाळी लहानचे सरपंच शोभाबाई रणखांब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी माजी सरपंच सुभाष देशमुख, ऊपसपंच सतिष देशमुख, स्वागताध्यक्ष संजयराव देशमुख लहानकर, पुज्य भदन्त उपगुप्तजी महाथेरो, पुज्य भदंत सत्यानंद थेरो, पुज्य भदन्त पय्याबोधी, पुज्य भदन्त सुभूती ऊपस्थिती राहणार आहेत.
पुज्य भदन्त धम्मसेवक महाथेरो (मुळावा), पुज्य भदंत सदानंद सदधम्मादित्य महाथेरो ( केळझर), पुज्य भदंत कृपाशरण महास्थविर, पुज्य भदन्त प्रा. खेम्मोधम्मो महाथेरो, पुज्य भदंत उपगुप्त महाथेरो, पुज्य भदंत बी. पी. थेरोज्योती (दिल्ली ), पुज्य भदन्त सत्यानंद थेरो (बुध्दगया), पुज्य भदन्त अश्वघोष महास्थविर, पुज्य भदन्त सुमेधबोधी महाथेरो, पुज्य भदंत पय्यारत्न, पुज्य भदन्त पय्याबोधी, पुज्य भदन्त किरिमारतन महाथेरो (श्रीलंका ), पुज्य भदंत मलाव्वे चंदिम थेरो ( श्रीलंका ), पुज्य भदन्त पय्याश्री, पुज्य भदन्त संघशिल महू ( मध्यप्रदेश ), पुज्य भदन्त ज्ञारक्षित, पुज्य भदन्त महाविरो, पुज्य भदन्त श्रध्दानंद (कर्नाटक ), पुज्य भदन्त शाक्यपुत्र अंगुलीमाल महाथेरो, पुज्य भदंत आर्यनाग अथदर्शी थेरो (मुंबई ) आदी देश विदेशातील विद्वान बौध्द भिक्खूची धम्मदेशना होणार आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES