• A
  • A
  • A
किनवट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या स्वयंपाकगृहांची दुरवस्था

नांदेड - किनवट तालुक्यात आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात जिल्हा परिषदेच्या २८१ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये १६ हजार ९०५ विद्यार्थी शालेय पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. यापैकी पाच शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचनशेड नसल्याने तसेच त्यांची दुरवस्था झाल्याने येथे खिचडी शिजवण्यासाठी मोठी परवड होत आहे. विद्यार्थ्यांना शालेय आहारापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

शाळांच्या स्वयंपाकगृहांची अशी अवस्था झाली आहे.


किनवट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २८१ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीचे १३ हजार १९१ विद्यार्थी असून सहावी ते आठवीचे ३ हजार ७१४ विद्यार्थी आहेत. अशा १६ हजार ९०५ विद्यार्थ्यांना खिचडी शिजवून दिली जाते. किनवट तालुक्यातील सुभाषनगर व शिवाजीनगर येथील दोन शाळा त्या इमारतीत भरतात.
हेही वाचा - नांदेडमध्ये शिक्षिकेचा विनयभंग; चौघांवर गुन्हा दाखल
जिल्हा परिषद हायस्कूल, कन्याशाळा किनवट, शिवनी व तोटांबा केंद्रांतर्गत एक शाळा अशा पाच शाळांना स्वतःची इमारत नाही. परिणामी तेथे किचनशेड नाही. तर तालुक्यातील अनेक शाळांमधील किचनशेडची बकाल अवस्था झाली आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा वेळ वाया जात आहे. याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चर्चा पालक वर्गातून होत आहे. त्यामुळे पोषण आहार शिजवण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करून किचनशेड दुरुस्तीची मागणी पालकांकडून होत आहे.
हेही वाचा - कृषी मूल्य आयोगाला स्वाय्यत दर्जा असल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणे शक्य नाही - पाशा पटेल
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES