• A
  • A
  • A
निलंग्यात फार्म हाऊसची चावी देण्यावरून सालगड्याचा खून

लातूर - शेतामध्ये बांधकाम सुरू असलेल्या फार्महाऊसच्या चावीवरून २ सालगाड्यामध्ये वाद झाला. हा वाद टोकाला पोहोचून यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना निलंगा शिवारात घडली.


फार्महाऊसची चावी देत नसल्याने सालगडी अंकुश निवृत्ती आवले (५५) यांच्या छातीवर आणि हातापायावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - मिनी ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक, ८ वर्षीय बालकाचा मृत्यू
निलंगा शहराला लागूनच बलीफ देशमुख यांची शेती आहे. यामध्ये अंकुश निवृत्ती आवले (रा. हालसीवाडी ता. निलंगा) व पेठ येथील बालाजी रामराव वरवटे हे सालगडी म्हणून काम करीत होते. गेल्या काही दिवसांपासून या शेतात घराचे आणि संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास बालाजी वरवटे याने दारूच्या नशेत भंगार साहित्य ठेवलेल्या खोलीची चावी मागितली. परंतु, एवढ्या रात्री चावी कशाला म्हणून अंकुश आवले यांनी चावी देण्यास नकार दिला. हाच राग मनात घेऊन बालाजी याने त्यांना कुऱ्हाडीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अंकुश यांच्या छातीवर आणि हातापायावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

हेही वाचा - गढीवरूनच ठरणार काँग्रेसचा उमेदवार; स्थानिक उमेदवारासाठी पदाधिकारी आग्रही
अत्यवस्थ असलेल्या अंकुश यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपाचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुलगा राम आवले यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलीस ठाण्यात बालाजी वरवटे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने अंकुश हे सालगडी म्हणून काम करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल चोरमले, पोलीस उपनिरिक्षक आर. डी. निलंगे करीत आहेत.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES