• A
  • A
  • A
पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा

लातूर - पाण्यासाठी निलंगा तालुक्यातील हलगरा ग्रामपंचायतीवर महिलांनी घागर मोर्चा काढला. हालगरा ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरु आहे. सरपंचासह ग्रामसेवकाच्या दुर्लक्षामुळे पाण्याची टंचाई झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.हलगरा ग्रामपंचायत ही १४ सदस्यांची आहे. ही तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ आहे. सरपंचासह ग्रामसेवकाचे पाण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष होत आहे. मानवनिर्मित पाणीटंचाईचा समाना ग्रामस्थांना करावा लागत आहे. जलसंधारणामध्ये पाणी फाऊंडेशनचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार हालगरा गावला मिळाला आहे. जलयुक्त शिवार अभियानातही मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे पाणीपातळीतही वाढ झाली आहे. असे असतानाही केवळ लोकप्रतिनीधींच्या दुर्लक्षामुळे घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांना शिवारात भटकंती करावी लागत आहे. मार्च महिन्याच्या मध्यावरच ही वेळ आली आहे.
गावालगतच असलेल्या विहीर, बोअरला पाणी असूनही अधिग्रहण केले जात नाही. त्यासंबंधीचे प्रस्ताव दाखल असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळावी यासाठी त्वरीत जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES