• A
  • A
  • A
माझी कर्जमाफी झाली साहेब..! शेतकऱ्यांच्या उत्तराने आदित्य ठाकरेंची गोची

लातूर - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या मराठवाड्यामध्ये दुष्काळ पाहणी दौरा करत आहेत. या दौऱ्यात एका शेतकऱ्याने दिलेल्या उत्तराने आदित्य ठाकरे यांची गोची झाल्याचा प्रसंग पाहायला मिळाला. गावभेटीवेळी आदित्य ठाकरेंनी कर्जमाफी प्रभावीपणे झाली नसल्याचा आरोप भाजपवर केला. मात्र, त्याचवेळी एका शेतकऱ्याने 'साहेब, माझी कर्जमाफी झाली आहे' असे उत्तर देताच आदित्य ठाकरे गोंधळून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.


हेही वाचा - अखेर 'त्या' घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे येथील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास निर्माण करत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी गरजेच्या वेळी शिवेसेनाला आवाज द्या, आम्ही तुमच्या सेवत हजर असल्याचे आवाहनही करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरे हे चालबुर्गा शिवारातील कर्जमाफी कशी फसली हे सांगत होते. तेव्हा त्यांच्याजवळ बसलेल्या एका शेतकऱ्याने मात्र, साहेब माझी कर्जमाफी झाली आहे, असे उत्तर दिले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना त्यावेळी नेमके काय बोलावे, असा प्रश्न पडला होता.


हेही वाचा -उजनी येथे दुधातून विषबाधा; जुळ्या बहिणींचा मृत्यू, दोघींची प्रकृती गंभीर

सध्याचा दुष्काळ गंभीर असल्याने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेत चाऱ्याचे व पाण्याच्या टाकीचे सर्वत्र वाटप करत आहेत. आज लातूर जिल्ह्यातील बुधोडा येथे फटाक्यांच्या आतषबाजीत या दुष्काळ पाहणीची सुरुवात झाली. गावातील शेतकऱ्यांशी त्यांनी १० मिनिट संवाद साधला. लातूर जिल्ह्यातील बुधोडा, चालबुर्गा आणि किल्लारी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून पशुखाद्याचे वाटप त्यांनी केले.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES