इंदूरचा प्रयोग लातुरात, कचऱ्यापासून होणार खतनिर्मिती
लातूर - कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न प्रत्येक शहराला भेडसवत राहिला आहे. मात्र, या समस्येवर लातूर मनपाने जालीम उपाय काढला आहे. लातूर शहरात इंदूरच्या धरतीवरील कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रयोग राबवला जाणार आहे. राज्यातील हा पहिला प्रयोग असून आजपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा-अखेर 'त्या' घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना शहरातील जवळपास ४० टक्के कचरा एकाच ठिकाणी आणून ही प्रक्रिया केली जाणार आहे. हा प्रयोग प्रभाग ११ मधील शासकीय जागेत होत आहे. भाजपचे नगरसेवक शिवकुमार गवळी यांनी कचरा निर्मुलनाचा अभ्यास करून इंदौर येथील पद्धती राबवण्याची संकल्पना मांडली होती. आज ती प्रत्यक्षात उतरवली जात आहे. यामध्ये शहरातील कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया व खतनिर्मिती प्रकल्प येथील शासकीय कॉलनीतील जागेत उभारण्यात आला आहे. या बंधिस्त जागेत सर्व यंत्रसामुग्री बसवण्यात आली असून आज पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीमध्ये या अनोख्या उपक्रमाला सुरुवात होत आहे. कचरा संकलित केल्यानंतर त्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाणार आहे. यामधून प्लॅस्टिक, धातू असे घटक वेगळे करून प्रक्रिया केली जाणार आहे. एवढेच नाही तर प्रक्रिया करून तयार झालेले खत नागरिकांच्या घरोघरी मोफत दिले जाणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. हेही वाचा-मनपाचा मनमानी कारभार; कचरा डेपोला लावलेल्या आगीमुळे ५ एकर ऊस खाक