• A
  • A
  • A
अखेर 'त्या' घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना

लातूर - अहमदपूर तालुक्यातील शिवनखेड येथील एका दलित महिलेस गावातील काही व्यक्तींनी अमानुष मारहाण केली होती. याप्रकरणी, कुठलीही कारवाई पोलिसांनी केली नव्हती. पण, यासंबंधी अहमदपूर पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. गावातील तंटामुक्ती अध्यक्षाचा भाऊच या मारहाणीत सहभागी असल्याचे सांगितले जात आहे.


शिवनखेड ग्रामपंचायतीमध्ये राजबाई सोनकांबळे या साफसफाई करतात. साफसफाई करत असतानाच तंटामुक्ती अध्यक्षांचा भाऊ गोटू ठाकून आणि आणखी दोघांनी त्यांना अमानुष मारहाण केली. यात राजाबाईंच्या चोहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, त्यांच्या कोपऱयाचे हाडदेखील मोडले आहे.

हेही वाचा - मनपाचा मनमानी कारभार; कचरा डेपोला लावलेल्या आगीमुळे ५ एकर ऊस खाक

पिडीत महिलेचा मुलगा बालाजी सोनकांबळे यांनी न्यायाची मागणी केली आहे. गोट्या ठाकूर, त्याचा भाऊ व चुलता आणि अजीत जमादार यांच्यावर मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत. या घटनेबाबत अहमदपूर पोलीस उप अधीक्षक अश्विनी शेलार यांना माहिती विचारली असता, गुन्हा नोंद करून घेण्यात आला आहे. गावात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES