• A
  • A
  • A
मनपाचा मनमानी कारभार; कचरा डेपोला लावलेल्या आगीमुळे ५ एकर ऊस खाक

लातूर - महापालिकेने कचरा डेपोला लावलेल्या आगीमुळे डेपो शेजारील ५ एकर ऊस जळाला. आगीबाबत शेतकऱ्यांनी महापालिकेकडे वारंवार तक्रार केली होती. मात्र, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने नांदगाव परिसरात ही घटना घडली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ही घटना आज सकाळी घडली.


हेही वाचा -व्यायामासाठी गेलेल्या दोन तरुणांना बसची धडक ; एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

शहरालगतच्या नंदगाव शिवारात अमोल श्रीपतराव पवार यांची १२ एकर शेतजमीन आहे. त्यांनी १० एकरमध्ये ऊस लावला आहे. या शेतजमीन शेजारी महापालिकेचा कचरा डेपो आहे. सध्या उसाची तोड सुरू असून लगत कचर डेपो असल्याने त्या धुराचा त्रास कामगारांना होत असल्याची तक्रार त्यांनी मनपाकडे केली होती. काही दिवसासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन दुसऱ्या जागेत करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले.

हेही वाचा -उजनी येथे दुधातून विषबाधा; जुळ्या बहिणींचा मृत्यू, दोघींची प्रकृती गंभीर
आज सकाळी कचरा डेपोला लावण्यात आलेल्या आगीमुळे बाजूला उभा असलेला ५ एकर ऊस जळाला. ऊसतोड कामगारांनी अथक परिश्रम करुन आग आटोक्यात आणल्याने २ एकरतील ऊस बचावला. याप्रकरणी अमोल पवार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES