• A
  • A
  • A
व्यायामासाठी गेलेल्या दोन तरुणांना बसची धडक ; एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी

लातूर - जिल्ह्यातील अहमदपूर येथे सकाळी ४ मित्रांसोबत व्यायाम करण्यास गेलेल्या २ तरुणांना पाठीमागून आलेल्या भरधाव बसने धडक दिली. यात एकाचा दवाखान्यात आणताना मृत्यू झाला. तर दुसरा तरुण जखमी झाला आहे.धडक देऊन बस चालक बस न थांबवता पळून गेला. अहमदपूर पोलीस ठाण्यात बसचालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चालक आंबादास गुंजुटे यास अटक केली आहे.

हेही वाचा- लग्नासाठी वाट्टेल ते..! लहान भावाची कागदपत्रे दाखवून मोठ्याशी लग्न; लातूरातील धक्कादायक प्रकार
अहमदपूर तालुक्यातील मोरेवाडी येथील ओमसाईल भाऊराव जाधव (१८), दिपक कानवटे, दिनेश मोरे, गणपत राकिले हे चौघे मोरेवाडी पाटीवर नांदेड-बिदर राज्य मार्गावर धावत होते. यावेळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान पाठिमागुन आलेल्या भरधाव बसने (एमएच २० डी. ९५२७०) दोन तरुणांना जोरदार धडक दिली व निघून गेला. त्यात ओमसाईल जाधव हा गंभीर जखमी झाला. सोबत असलेल्या दिपक कानवटे याने ओमसाईल याला सुर्यवंशी नामक अॅटो चालकाच्या मदतीने अहमदपूर येथील दवाखान्यात दाखल केले. तेव्हा तेथील अधिकाऱयाने त्याला मृत घोषीत केले.
हेही वाचा- एक पत्र व्यसनमुक्तीसाठी; पाल्यांचे पालकांना भावनिक अवाहन
मृत ओमसाईल जाधव हा उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिकत होता. तो एकुलता एक मुलगा होता. मृत ओमसाईल याच्या चुलत्याच्या फिर्यादीवरुन अहमदपूर पोलिसांनी बस चालकाविरुध्द भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने बस चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES