• A
  • A
  • A
एक पत्र व्यसनमुक्तीसाठी; पाल्यांचे पालकांना भावनिक अवाहन

लातूर - आतापर्यंत व्यसनमुक्तीसाठी एक ना अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. मात्र, योग्य त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने जागतिक कर्करोग दिनापासून जिल्ह्यात एक वेगळा उपक्रम राबविला जात आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये व्यसनमुक्तीबाबत विद्यार्थ्यांना धडे दिले जात असून या ठिकाणीच पालकांसाठी व्यसनापासून दूर राहण्याच्या अनुशंगाने एक पत्र लिहिले जात आहे.


भावनिक आवाहनातून का होईना, व्यसनमुक्ती या चळवळीला यश मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये व्यसनमुक्तीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मात्र, व्यसनमुक्तीसंदर्भांत खरे मार्गदर्शन हे पालकांना गरजेचे असल्याने या वेगळ्या उपक्रमाची सुरुवात औसा विवेकानंद माध्यमिक व प्राथमिक शाळेपासून करण्यात आले.
व्यसनापासून होणारे आजार, आर्थिक नुकसान, यापासून वंचित राहण्याबाबत राहुल खरात यांनी मार्गदर्शन केले. कुटुंबातील व्यसन करणाऱ्या व्यक्तींसाठी मुलांनी पालकांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये व्यसनापसून होणारे नुकसान, कुटुंब व्यवस्थेवर होणारा परिणाम, आर्थिक नुकसान या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. व्यसनमुक्तीसंदर्भात जनजागृती तर केली जातेच परंतु, आपल्या मुलांनीच याबाबत भावनिक अवाहन केल्याने नक्कीच बदल होणार असल्याचा विश्वास गटशिक्षणधिकारी राम कापसे यांनी यावेळी व्यक्त केला.
औसा येथून सुरू झालेला हा उपक्रम सर्वच जिल्ह्यात राबविला जात असल्याचे सलाम फाऊंडेशनच्या राहुल खरात यांनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES