• A
  • A
  • A
लग्नासाठी वाट्टेल ते..! लहान भावाची कागदपत्रे दाखवून मोठ्याशी लग्न; लातूरातील धक्कादायक प्रकार

लातूर - लहान भावाच्या नोकरीची कागदपत्रे दाखवून मोठ्याशी लग्न लावल्याचा प्रकार अहमदपूर येथे समोर आला आहे. फसवणूक लक्षात आल्यानंतर मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र


लग्न हा आजकालच्या तरुण मुलांसमोरील एक यक्षप्रश्न ठरू लागला आहे. उच्च दर्जाची जिवनशैली प्रत्येकाला भूरळ घालत आहे. त्यामुळे प्रत्येक मुलगी लग्नासाठी नोकरदार मुलाचीच मागणी करत आहे. त्यातही पगारानुसार प्राथमिकता ठरवली जात आहे. अशात कमी शिकलेल्या आणि चांगल्या पगाराची नोकरी नसलेल्या तरुणासमोर लग्न हे एक आव्हान ठरले नाही, तरच नवल. त्यामुळे लग्नासाठी मोठा आटापीटा करताना मुलाकडची मंडळी दिसतात. पण, याच अगतिकतेपोटी चक्क खोटे बोलून फसवणूक केल्याचा प्रकार अहमदपूर येथे समोर आला आहे.

अहमदपूर येथील एका तरुणीला देगलूर येथील जयेंद्र जाधव या तरुणाचे स्थळ सांगून आले होते. तरुणाच्या घरच्यांनी जयेंद्रचेच नाव विजेंद्र असेही असल्याचे सांगितले. विजेंद्र जाधव या नावाची शैक्षणिक कागदपत्रे दाखवली. तसेच, मुलगा पुण्यात नोकरीस असल्याचे सांगितले. यावर मुलीकडच्यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर, १० डिसेंबर २०१८ ला दोघांचे लग्न लावण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लग्नानंतर मुलीच्या लक्षात आले. वास्तविक विजेंद्र हा जयेंद्रचा लहान भाऊ असून, जयेंद्र हा अर्धशिक्षीत आहे.

हेही वाचा - महिला सफाई कर्मचाऱ्यास बेदम मारहाण; तंटामुक्त समिती अध्यक्षांच्या भावाचा प्रताप

त्यानंतर मुलीने अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या महिन्याभरापासून तरुणीस सासरच्या मंडळीनी त्रास देण्यास सुरवात केली आहे. तसेच, तिच्याकडे २५ लाखांची मागणी केली जात असल्याचा आरोप मुलीने केला आहे. मुलीच्या आई-वडिलांनी जाधव कुटूंबीयांकडे विचारणा केली असता, तुमच्या मुलीस घरातून हकालून दिल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी, अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES