• A
  • A
  • A
औसा-तुळजापूर रस्त्यावर जीप-टँकरचा अपघात; २ ठार, ७ जखमी

लातूर - औसा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी बेलकुंडजवळ टँकर आणि जीपमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, जखमींना तातडीने उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.


हेही वाचा -महिला सफाई कर्मचाऱ्यास बेदम मारहाण; तंटामुक्त समिती अध्यक्षांच्या भावाचा प्रताप
येरोळ (ता. शिरूर) अनंतपाळ येथून कौटुंबीक कार्यक्रम उरकून एक कुटुंब तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जीपने ( एम.एच. २४ सी. ६४५७) निघाले होते. उजनीहून बेलकूंडच्या दिशेने येणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या टँकरची दुपारी अडीचच्या सुमारास जीपला धडक बसली. यामध्ये अरुण कोयंडे व विवेक राजेशिर्के (मूळ रा.शेंद्री जि.सातारा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर जीपमधील जखमी मच्छिंद्र कल्याणकर (३५), मच्छिंद्र भालेकर (३७), संजय चव्हाण (३३), नितीन वाघमारे (३५), नितेश कतडदोड (३८) व टँकर मधील हरीनारायन यादव, प्रमोद तिवारी, कपिल मुनी असे एकूण ८ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा -उदगीर येथे तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
हा अपघात इतका भीषण होता की, अपघातातील टँकर जागीच उलटून पडला, तर जीपचा चेंदामेंदा झाला होता. अपघातस्थळी तातडीने औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार शोभा पुजारी व भादा पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेत जखमींना तातडीने उपचारांसाठी पाठवले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES