• A
  • A
  • A
महिला सफाई कर्मचाऱ्यास बेदम मारहाण; तंटामुक्त समिती अध्यक्षांच्या भावाचा प्रताप

लातूर - अहमदपूर तालुक्यातील शिवनखेड येथील ग्रामपंचायतीमध्ये साफसफाई करण्यास आलेल्या महिला कर्मचाऱ्यास क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अहमदपुर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून महिलेवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हेही वाचा - लग्नाच्या ८ दिवस अगोदरच तरुणीवर काळाचा घाला; केळवण करून परतताना अपघात
पीडित राजाबाई सोनकांबळे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात सफाईसाठी आल्या होत्या. दरम्यान, तंटामुक्तीचे अध्यक्षांचे भाऊ गोटू ठाकूर कार्यालयात हजर होते. सफाई झाल्यानंतर कार्यालयात या, असे सांगत राजाबाई सफाईसाठी पुढे सरसावल्या. यावरूनच 'तू मला असे सांगणारी कोण?' असा जाब विचारत गोटू ठाकूर आणि इतर ३ जणांनी काठ्यांनी राजाबाईस मारहाण केली आहे. या मारहाणीत राजाबाई यांचा हात मोडला आहे, तर नाकालाही इजा झाली आहे. अंगावर अनेक ठिकाणी मुक्कामारही लागला आहे. याबाबत त्यांनी सरपंचाकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. यावरून हाळी पोलीस चौकीत गेल्यावर पोलिसांनी अहमदपूर ग्रामीण पोलिसांत जाण्यास सांगितले. राजाबाईने गंभीर अवस्थेतच अहमदपूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दिला. त्यानंतर अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात उपाचारासाठी गेली असता त्यांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES