• A
  • A
  • A
बस आणि ट्रकचा अपघात; २० प्रवासी किरकोळ जखमी

लातूर - लातूर-औसा मार्गावरील बुधोडा गावाजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाल्याची घटना दुपारी २ च्या सुमारास घडली. यात बसमधील २० प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा -शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आमदाराचे उपोषण
औसा आगाराची औसा-लातूर ही बस (एम.एच २० बीइ ११२३) लातूरकडे जात होती. समोरील ट्रक (एम. एच. २४ ए. यु ३२३) आणि बसमध्ये सुरक्षित अंतर राहिले नसल्याने अपघात झाला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस ट्रकवर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसून जखमी प्रवाशांना लातूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा - वीजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने कानडी बोरगावात ४ एकर ऊस जळून खाक
प्राथमिक तपासणी करून जखमी प्रवाशांना सोडण्यात आले आहे. औसा येथून लातूरकडे येणारी बस भरधाव वेगात होती, त्यामुळे ट्रक आणि बसमध्ये सुरक्षित अंतर राहिले नाही. अपघात टाळण्याच्या हेतूने बस चालकाने अचानक जोरात ब्रेक लावला, यामध्ये बसमधील प्रवाशी जखमी झाले. अपघातातील ट्रकही लातूरमधील आहे. घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयातील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती.
नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात आणले असून उपचार केले असल्याचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES