• A
  • A
  • A
शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आमदाराचे उपोषण

लातूर - अहमदपूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे, असा आरोप अपक्ष आमदार विनायक पाटील यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांना विम्याची रक्कम लवकर देण्यात यावी, या मागणीसाठी पाटील चाकूर तहसीलसमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.


चाकूर, अहमदपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा रक्कम भरली होती. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नाही, असा आरोप पाटील यांनी केला. अपक्ष म्हणून निवडून आलेले पाटील पुन्हा भाजपमध्ये गेले होते. मात्र, आता त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा - वीजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने कानडी बोरगावात ४ एकर ऊस जळून खाक

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आगामी अधिवेशनातही आंदोलन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. सत्ताधारी आमदारांनाच उपोषणास बसावे लागत असल्याने हे सरकारचे अपयश असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES