• A
  • A
  • A
वीजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने कानडी बोरगावात ४ एकर ऊस जळून खाक

लातूर - तालुक्यातील कानडी बोरगाव येथील शिवारात वीजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने ४ एकरातील ऊस जळाला आहे. सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.


हेही वाचा - नांदेड विभागातील ५ जिल्ह्यात ३५ साखर कारखाने सुरू; ८० लाख ७० हजार टन...
पाण्याची उपलब्धता नसतानाही शेतकऱ्यांनी यंदा तळहातावरील फोडाप्रमाणे ऊसाची काळजी घेतली होती. सध्या अंतिम टप्प्यात असलेला ऊस महावितरणच्या गलथान कारभारामुळे जळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. कानडी बोरगाव येथील रमेश पुजारी यांचा अडीच एक्कर तर, शंकर विभूते यांचा दीड एकर ऊस आणि ठिबकसह, खताची पोती आणि शेती अवजारे ठेवलेला गोठा विद्युत तारेच्या ठिणगीने जळाला आहे.

राजाभाऊ गवारे यांच्या शेतामध्ये विद्युत पोल असून त्याच्यालगत शिवरूप पुजारी यांचे जमीनक्षेत्र आहे. या विद्युत पोलवरील वीजेच्या तारा जीर्ण झाल्याने घर्षण झाले आणि ही घटना घडली. शिवरूप पुजारी यांच्या क्षेत्रात असलेले ऊसाचे पाचरट जळाले आणि त्यानंतर शंकर विभूते यांच्या जमीन क्षेत्रातील उसाला आग लागली असल्याचे शेतकत्यांनी सांगितले. निसर्गाची अवकृपा आणि त्यामध्ये महावितरणचा गलथान कारभार यामुळे ऊस जळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - बोरी येथे २ एकर उसाला लागली आग; संपूर्ण ऊस जळून खाक
दरम्यान, घटना झाल्यानंतर दुपारी २ पर्यंतही घटनास्थळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले नव्हते. यामुळे पंचनामा करून आम्हाला त्वरित मदत द्यावी, अशी मागणी या दोन्ही शेतकऱ्यांनी केली आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES