• A
  • A
  • A
वाहतूक सुरक्षा सप्ताहातच वाहतुकीचे तीन-तेरा..!

लातूर - बारमाही वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवून वाहतूक करणारे नागरिक किमान पोलीस प्रशासनाच्या वाहतूक सुरक्षा सप्ताहात तरी नियमांची अंमलबजावणी करतील अशी अपेक्षा होती. मात्र, या सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच नियमांचे पालन केले नसल्याचे दिसून आले. येथील प्रशसकीय इमारतीमध्ये पोलीस प्रशासनाच्यावतीने वाहतूक नियमांचे धडे दिले जात होते तर बाहेर नो-पार्कींगच्या ठिकाणीच पार्कींग केली जात होती.


हेही वाचा - घराणेशाही संपविण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे सर्वसामान्य ४८ उमेदवार - प्रकाश आंबेडकर
सोमवारपासून वाहतूक सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने सकाळी जनजागृतीविषयी शहराच्या मुख्य मार्गावरून विद्यार्थ्यांनी रॅलीही काढली. सकाळी ११ च्या दरम्यान येथील प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने,शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात होती. तर दुसरीकडे या प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयातील कर्मचारीच नो पार्कींगच्या ठिकाणी वाहने लावत होती. किमान या सप्ताहात तरी अधिकारी-कर्मचारी यांनी नियमांचे पालन करावे याकरिता वाहतूक पोलीस कर्मचारी प्रयत्न करीत होते. मात्र, आम्ही या ठिकाणीच वाहने पार्कीग करतो. आम्हाला कोणी अडवू शकत नाही अशा प्रकारे येथील कर्मचारी-अधिकारी हे हुज्जत घालीत होते. त्यामुळे एकीकडे वाहतूक नियमांचे धडे आणि दुसरीकडे वाहतूक नियमांचे तीन-तेरा असे चित्र पाहवयास मिळाले.
हेही वाचा - भाजपला हरवायचे असेल तर काँग्रेसने वंचित आघाडीला पाठींबा द्यावा - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
प्रशासकीय इमारतीमध्येच नाही सर्व प्रशासकीय कार्यालयामध्ये हीच स्थिती असून रोडवर धावणाऱ्या वाहनांपासून ते पार्कींगपर्यंतच्या वाहतूकीवर अंकूश घालने हे वाहतूक पोलीस प्रशासनासमोर अव्हान आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES