• A
  • A
  • A
घराणेशाही संपविण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे सर्वसामान्य ४८ उमेदवार - प्रकाश आंबेडकर

लातूर - राजकारणातील घराणेशाही संपवून सर्वसामान्याला न्याय आणि हक्क देण्याचा प्रयत्न राहणार असून तो प्रत्यक्षात उतरवला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये ४८ उमेदवार हे सर्वसामान्य आहेत, असे वक्तव्य अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. आज लातुरात सत्ता संपादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.


राम मंदिराचा मुद्दा हा केवळ हिंदू- मुस्लिमांमध्ये दंगली घडवून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न राहणार, असा घणाघात भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर केला.

मागच्या ६ महिन्यापासूनचा राम मंदिराचा मुद्दा ते परवा सादर केलेला अर्थसंकल्प हे केवळ राजकीय उद्देश समोर ठेवून केलेला भाजपचा बनाव आहे, असे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडी स्थापनेचा उद्देश आणि परिवर्तनाची चळवळ यशस्वी करण्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गेल्या ७० वर्षांपासून शिक्षणापासून बेरोजगारीचे प्रश्न आहे त्याच स्वरूपात पाहवयास मिळतात. वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास प्रथम शिक्षणाला प्राधान्य देऊन ३ टक्के होणारा खर्च १० टक्के केला जाणार आहे.
लातूर लोकसभेच्या उमेदवाराचीही घोषणा -

प्रकाश आंबेडकर यांनी लातूर लोकसभेचा उमेदवार म्हणून राम गारकर यांची घोषणा केली. गारकर हे शैक्षणिक क्षेत्रातील असून लातुरकर योग्य निर्णय घेतील, असा विश्वास अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. भाजपचे सरकार सत्तेत राहणार असेल तर संविधानिक संस्था मोडीत निघतील. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत योग्य पर्याय आघाडीच्या माध्यमातून समोर आहे, असे त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, एम. आय. एमचे जिल्हाध्यक्ष ताहेर हुसेन सय्यद आदी उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES