• A
  • A
  • A
भाजपला हरवायचे असेल तर काँग्रेसने वंचित आघाडीला पाठींबा द्यावा - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

लातूर - भाजपला हरविण्याची ताकद केवळ वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे. या सबंध गोष्टींचा विचार करून भाजपला सत्तेतून हद्दपार करायचे असेल तर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला पाठींबा देणे आवश्यक असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.


सोमवारी लातूर येथे दुपारी ४ च्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन सभा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपला हरविण्याची धमक केवळ वंचित बहुजन आघाडीमध्येच असून काँग्रेसने याचा विचार करावा असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -लातूर - बार्शी रोडवर विचित्र अपघात; ४ जणांचा मृत्यू, २ गंभीर
ममता बॅनर्जींना पाठिंबा
ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये घटनात्मक पेच नाही. मात्र, केंद्र सरकारला अशी भूमिका घेता येत नाही. तो राज्याचा विषय असल्याने यामध्ये कसलेही राजकारण नाही. त्यांच्या निर्णयाला आमचा पाठींबाच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला थांबिवताना आगोदर केंद्र सरकारला तसे लेखी कळविले होते की, आमच्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था आम्ही हाताळण्यास सक्षम आहोत. असे असतानाही केंद्र सरकारने यामध्ये लक्ष दिले असल्याने सरकार उघडे पडले आहे. त्यामुळे त्यांना पाठींबा असून त्यांनी बोलावले तर भेटीसही जाण्याची तयारी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दर्शिवली.

हेही वाचा -आर्थिक मागासवर्गीयांच्या १० टक्के आरक्षणाला कॅबिनेटची मंजुरी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES