• A
  • A
  • A
लातूर - बार्शी रोडवर विचित्र अपघात; ४ जणांचा मृत्यू, २ गंभीर

लातूर - तालुक्यातील साखरा पाटी जवळ एका भरधाव टिप्परने तीन दुचाकींना उडविले असून यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.


नागनाथ यलगटे (३०) (रा. चाटा भोपळा, ता. लातुर), शंकर बाबू काळे (२८), बुद्धघोष नामदेव पालके (दोघेही रा. येडशी ता. जि. उस्मानाबाद) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप पांडुरंग माळी (३१) ( रा.एकुर्ग ता. जि. लातूर) यांचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा युवक ताब्यात
या तिन्हीही दुचाकी लातूरकडे येत होत्या, तर टिप्पर हे बार्शीकडे मार्गस्थ होत होते. टिप्पर चालकाचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. साखरपाटी शिवारात ही घटना झाली असून गतेगाव पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद झाली आहे.
हेही वाचा -आर्थिक मागासवर्गीयांच्या १० टक्के आरक्षणाला कॅबिनेटची मंजुरी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES