• A
  • A
  • A
स्कूल बस पलटली; लिफ्ट मागून बसलेल्या तरुणीचा मृत्यू, २५ विद्यार्थी जखमी

लातूर - उदगीर तालुक्यातील मादलापूर मार्गावरील आदित्य इंग्लिश स्कूलची स्कूल बस चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर उलटली. या अपघातात प्रियंका व्यंकट बोईनवाड या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा - धुळ्यात १६५ किलो कोरडा गांजा जप्त; आरोपी फरार

तालुक्यातील आवलकोंडा येथील शालेय मुले घेऊन ही स्कूलबस (एम.एच.१२ एफ.सी ३२२१) उदगीरकडे मार्गस्थ होत होती. दरम्यान, प्रियंकालाही उदगीर येथील महाविद्यालयात जायचे असल्याने बसचालकाने तिला लिफ्ट दिली. गावाबाहेरील मुख्य रस्त्यावर स्कूलबस येताच या बसचा अपघात झाला. यात प्रियंका बोईनवाड हिचा मृत्यू झाला तर आदित्य इंग्लिश स्कुलचे २० ते २५ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा - अकोल्यात अंतर्गत वादातून एकावर प्राणघातक हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच उदगीर पोलीस ठाण्याचे नामदेव सारूळे, चंद्रकांत कलमे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आहे. शवविच्छेदनासाठी तरुणीचा मृतदेह उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES