• A
  • A
  • A
लातुरात नापिकीला कंटाळून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

लातूर - सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गणेशवाडी येथे घडली आहे. एकनाथ शिवाजी येमले (वय ३०), असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


हेही वाचा - 'वाह रे सरकार तेरा खेल, मांगा न्याय मिला जेल..!' भुजबळांचा भाजपवर निशाणा

गेल्या २ वर्षापासून नापिकी आणि बँकेचे वाढत असलेले कर्ज या नैराश्यातून त्यांनी रविवारी शेतामधील चिंचेच्या झाडाला गळफास घेतला. शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. व्यंकट ग्यानोबा साबदे यांच्या खबरीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बीट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिराम सोनकांबळे हे तपास करीत आहेत.

हेही वाचा - भीमाशंकर मार्गावर भाविकांच्या खासगी बसला अपघात, ४ जण गंभीर तर २६ किरकोळ जखमी



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES