• A
  • A
  • A
तक्रारींच्या प्रतिक्षेत जालना ग्राहक तक्रार निवारण मंच

जालना - सामान्य ग्राहकांची बाजारात होणारी फसवणूक थांबवून त्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापना केली गेली. मात्र या कार्यालयाच्या कामकाजाविषयी जनतेमध्ये जनजागृती नसल्यामुळे ग्राहकांचे या कार्यालयात तक्रार नोंदविण्याचे प्रमाण अंत्यत कमी असल्याचे चित्र दिसून आले आहे.


ही परिस्थिती प्रामुख्याने दिसून आली आहे ती जालना ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या कार्यालयात! २०१८ पासून ते आत्तापर्यंत केवळ २१८८ ग्राहकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार येथील ग्राहक मंचामध्ये नोंदविली आहे.
दैनंदिन जीवनात ग्राहकांची फसवणूक होणे असे प्रकार काही नवीन नाहीत. मापात जाणीवपूर्वक केले जाणारे घोळ, वीज मंडळाकडून दिली जाणारी चुकीची बिले, प्रवाशांची फसवणूक, वित्तीय संस्थाकडून होणारी फसवणूक अशा अनेक प्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. आणि या फसवणुकीची दाद मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये न्याय मागण्याची सुविधाही शासनाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र तरीही येथील कार्यालयातील जनतेच्या तक्रारीचा ओघ अत्यंत कमी आहे.
जालना शहरात ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासंदर्भात न्यायदानासाठी तीन सदस्यीय पीठ काम करत आहे. ग्राहक तक्रार मंचाचे हे कार्यालय मुख्य रस्त्यावरुन दिसत नसल्याने अडगळीत पडले आहे. या कार्यालयाच्या जनजागृतीसाठी आणि माहितीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे, मात्र ते देखील होत नाही.पर्यायाने या कार्यालयातील कामकाजाविषयी जनतेमध्ये जनजागृतीच नाही.

हेही वाचा- CSMT पूल दुर्घटना: दोन अभियंते निलंबित, कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस
अन्य शासकीय कार्यालयात प्रमाणे इथे देखील आपली चप्पल झिजवावी लागेल या भीतीपोटी तक्रारदार ग्राहक देखील या कार्यालयाकडे फिरकत नाही. मात्र जेवढ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या त्यावर जर एक नजर टाकली तर वेगळीच हकीकत असल्याचे चित्र दिसून येते. गेल्या १८ वर्षांमध्ये म्हणजे सन २००२ पासून आतापर्यंत एकूण २१८८ तक्रारी दाखल केल्या गेल्या. त्यापैकी २०६९ तक्रारींचे निवारण केले गेले. तक्रार निवारणाची टक्केवारी ९४ टक्के होती. ग्राहकांच्या बाजूने निकाल लागण्याची टक्केवारी पाहिली तर ती सुमारे ७० टक्के असल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा नीलिमा किशोर संत यांनी दिली.
हेही वाचा- बालबुद्धीने विधाने करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही, पवारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलेCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES