• A
  • A
  • A
आता कुठे जाता ! दानवेंच्या धमकीने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दहशत

जालना - लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे निवडणूक लढवतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये होता. त्यामुळे भोकरदन तालुक्यातील काही शिवसेना कार्यकर्त्यांनी दानवेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. मात्र, ते कार्यकर्ते आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दानवेंकडून होणाऱ्या त्रासाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी खोतकर यांच्या बंगल्यावर येऊन त्यांना होत असलेल्या त्रासाचा पाढाच वाचून दाखवला.


खासदार दानवे हे विरोधकांची कशी कोंडी करतात ते त्यांनी उघडपणे सांगितले. एकंदरीत खासदार दानवे आणि खोतकर यांच्या भांडणांमध्ये तिसऱ्याचा लाभ होणे तर सोडाच, मात्र कार्यकर्त्यांचा "कोळसा" होणार यात आता शंकेला जागा राहिली नाही. भोकरदन जाफराबाद हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मागील वर्षभरापासून घुसखोरी करून कार्यकर्त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत खासदार दानवेच्या विरोधात काम करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खोतकर यांच्या बाजूने लढा देत दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये भांडणेही केली.

वाचा- लोकसभेसाठी सोलापुरातून सुशीलकुमार शिंदेच पुन्हा काँग्रेसचे उमेदवार
खोतकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता मावळत गेल्यामुळे १२ तारखेला कार्यकर्त्यांनी थेट खोतकरांच्या बंगल्यात ठिय्या देऊन कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा आग्रह केला. याच वेळी खासदार दानवे यांना 'भंगार' म्हणणाऱ्या या कार्यकर्त्यांमध्ये घबराट देखील दिसली. दानवे हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना 'भामटे' म्हणतात आणि आता कुठे जाता? अशा धमक्या देत असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
वाचा- जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम झाले डाऊन; नेटीझन्स नाराज
दरम्यान, प्रचंड दहशतीखाली असलेल्या या कार्यकर्त्यांनी खोतकर यांनी निवडणूक न लढल्यास आपण आत्महत्या करू, असा इशाराही कार्यकर्ते कैलास पुंगले यांनी दिला. तर मनीष श्रीवास्तव यांनीही शिवसेना संपविणाऱ्यांना आम्ही आता सोडणार नाहीत, अशा पद्धतीने खासदार दानवे यांना एक प्रकारचे आव्हान दिले आहे. जालना जिल्ह्यातून सर्वात जास्त घाबरलेल्या शिवसैनिकांमध्ये भोकरदन तालुक्यातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES