• A
  • A
  • A
आमदार अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवेंविरुद्ध ठोकला शड्डू, 'अशी' घेतली शपथ

जालना - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतरच केस वाढवेन आणि डोक्यावरची टोपी काढेल, अशी शपथ काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली आहे. त्यामुळे जालना लोकसभा निवडणूक सत्तार यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.


हेही वाचा-वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे गुडघ्याला बाशिंग, जागेच्या वाटाघाटीपूर्वीच जाहीरनामा जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी जालना मतदार संघातून काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांमध्ये आमदार अब्दुल सत्तार आणि माजी आमदार कल्याण काळे यांची नावे आघाडीवर आहेत. जालना मतदार संघाचे खासदार रावसाहेब दानवे पराभूत झाल्यावरच मी माझ्या डोक्यावर केस वाढवेन आणि डोक्यावर घातलेली टोपी काढेल, अशी शपथ आमदार अब्दुल सत्तार यांनी घेतली होती. आता ती शपथ पूर्ण करण्याची वेळ आली असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

जालना लोकसभा मतदार संघातून डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी मिळाली तर आपण मुख्य प्रचारक म्हणून काम करू आणि मला तिकीट मिळाले तर कल्याण काळे हे माझी प्रचाराची धुरा सांभाळतील. त्यामुळे दानवे यांचा पराभव होईल, असे अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांची जुनी आणि चांगली मैत्री असल्याचे नेहमीच बोलले जाते. अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे असले तरी लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना मदत करतात आणि विधानसभेत सिल्लोड मतदार संघातून अब्दुल सत्तार यांना रावसाहेब दानवे मदत करतात, असे बोलले जाते, या विषयावर बोलताना अब्दुल सत्तार यांनी यावेळी दानवे यांचा पराभव निश्चित असल्याचे सांगितले.

हेही वाचा-खोतकरांना अजूनही उद्धव ठाकरे यांच्या निरोपाची अपेक्षा



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES