• A
  • A
  • A
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे गुडघ्याला बाशिंग, जागेच्या वाटाघाटीपूर्वीच जाहीरनामा जाहीर

जालना - वंचित बहुजन आघाडी जागावाटपाचा तिडा अजून सुटलेला नाही. तसेच पक्षाची ध्येय धोरणे आणि जाहीरनामा ठरलेला नाही. तरी देखील जालन्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा चार कलमी जाहीरनामा आजच जाहीर केला. त्यामुळे जालन्याची जागा इतर पक्षाला सुटली तर डॉ. शरदचंद्र वानखेडे यांचे काय? असा प्रश्न निर्माण होणार आहे.


हेही वाचा - काँग्रेससोबत आघाडी नाहीच; प्रकाश आंबेडकरांची अकोल्यात घोषणा
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. शरदचंद्र वानखेडे यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र अजूनपर्यंत वंचित आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहणार का? स्वतंत्र लढणार हा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या दोन पक्षांपैकी कोणासोबतही ही वंचित आघाडीने आघाडी केली तर दोन्ही पक्ष आप आपला दावा जालन्याच्या जागेसाठी करणार आहे. त्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे .मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. वानखेडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा चार कलमी जाहीरनामा जाहीर केला. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांमधील प्रचार आणि जाहीरनाम्याची "बोहणी" डॉक्टर वानखेडे यांनी केली आहे. मात्र, बोहणीचे हे पहिले गिऱ्हाईक किती दिवस दम धरणार? हे दोन दिवसातच आंबेडकर घेणाऱ्या निर्णयावर अवलंबून आहे. वानखेडेंच्या जाहीरनाम्यात सक्तीचे शिक्षण आणि तेही मोफत तसेच उद्योजकांसाठी विना तारण कर्ज हे विषय सामील आहेत .
हेही वाचा - 'धनगर समाजाची फसवणूक केली, आता आम्ही सरकारचे पानिपत करू'
आजच्या या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते डॉ. सुभाष माने, भारिपचे जिल्हाध्यक्ष दीपक डोके, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे, संभाजी पाटील शिरसाठ ,प्राध्यापक कनकुठे आणि विजय लहाने उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES