• A
  • A
  • A
खोतकरांना अजूनही उद्धव ठाकरे यांच्या निरोपाची अपेक्षा

जालना - लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेचे उमेदवार म्हणून भाजपचे विद्यमान खासदार तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव अधिकृतपणे जाहीर झाले आहे. असे असतानाही दानवे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून समोर आलेले शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडून निरोप येण्याची अपेक्षा अजूनही आहे.


गेल्या वर्षभरापासून जालन्यामध्ये खोतकर विरुद्ध दानवे वाद आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. शिवसेना-भाजपची युती झाली नसती तर हे दोन्ही उमेदवार समोरासमोर लढले असते. मात्र, युती झाल्याने खोतकर यांची मोठी गोची झाली आहे. आपण लोकसभा निवडणूक लढविणारच अशी घोषणा त्यांनी केली आहे. मात्र, आज झालेल्या घोषणेमध्ये जालना लोकसभेसाठी खासदार दानवे यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांना पुढील भूमिका विचारली असता त्यांनी आपल्याला अजूनही उद्धव ठाकरे यांचा निरोप येईल, तसेच कोणाच्या नावाची घोषणा झाली हे माहीत नसल्याचे सांगितले. दरम्यान काल मुंबईमध्ये ठाकरे फडणवीस यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाल्यानंतर आज हे निर्णय जाहीर झाले आहेत.
हेही वाचा- हे वागणे विखेंना शोभणारे नाही; बाळासाहेब थोरातांची टीका
आपली तब्येत बरोबर नसल्याचे कारण सांगून आपण मुंबईला गेलो नाहीत, अशी पुष्टीही खोतकर यांनी सोबत जोडली. आज सकाळी खासदार दानवे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खोतकर यांच्या भाग्यनगर येथील दर्शना बंगल्यावर मात्र नेहमीप्रमाणे दिसणारी वर्दळ होती. त्यामध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याचे जाणवत होते. एकंदरीत बंगल्यावर मात्र 'सन्नाटा' होता.

हेही वाचा-ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला भाजप नगरसेविकेची मारहाण

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES