• A
  • A
  • A
...अन् अर्जुन खोतकरांचा 'तो' प्रयत्न सपशेल ठरला फोल

जालना - भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांना उचकवून देण्याचा प्रयत्न अर्जुन खोतकर यांनी केला. मात्र, दानवेंच्या हे लक्षात आल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. २ तारखेला असाच प्रयत्न खोतकर यांनी केला होता. मात्र, तो फसल्यानंतर आज पुन्हा एकदा खासदारांना उचकवण्याचा प्रयत्न फसला.


आचारसंहिता लागण्याच्या शेवटच्या घटकेवेळी आज रविवारी (दि.१०) नवीन जालना आणि जुना जालना भागाला जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे नूतनीकरण होते. या निमित्त हे दोघेही पुन्हा एकदा मांडीला मांडी लावून बसले होते. ब्रिटिश कालीन असलेला हा पूल मोडकळीस आल्याचे पत्र इंग्रजांनी जालना नगरपालिकेला पाठवून मुदत संपल्याचेही सांगितले होते. त्या धर्तीवर १३ कोटी रुपये खर्चून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

या पुलाच्या भूमिपूजनानिमित्त खासदार दानवे आणि खोतकर पुन्हा एकदा आज एकत्र व्यासपीठावर आले. एवढेच नव्हे तर मांडीला मांडी लावून भूमिपूजनही केले. याच दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी आपल्याला संधी द्यावी तसेच आपण अजून माघार घेतली नाही, हे सांगायलादेखील खोतकर विसरले नाहीत.

जाहीरपणे व्यासपीठावरून खासदार दानवे यांच्याकडे केलेली ही मागणी आणि त्या नंतर दिलेला इशारा त्यामुळे खासदार दानवेकडून भाषणांमधून काहीतरी प्रतिक्रिया येईल, असे अपेक्षित होते. मात्र, आपल्याला उचकवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खोतकर यांच्या विधानावर कोणतेही भाष्य न करता शासकीय भाषणाप्रमाणे भाषण करून उद्घाटन आटोपते घेतले.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES