• A
  • A
  • A
जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी ११ मार्चपासून बेमुदत संपावर

जालना - न्याय व हक्काच्या मागण्यासाठी बँक व व्यवस्थापणाने सकारात्मक निर्णय न घेतल्याने को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॅाईज युनियनच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह ६४ शाखांच्या १८१ कर्मचार्‍यांनी ११ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.


हेही वाचा-रुग्णालयाच्या बाथरूममध्ये सापडले नवजात अर्भक
याबाबत युनियनच्यावतीने सरचिटणीस सतिश लोमटे, उपाध्यक्ष प्रभाकर गायकवाड, कोषाध्यक्ष दिलीप तौर यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, प्रलंबीत व रास्त मागण्या मान्य कराव्यात, यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. तरी देखील कर्मचार्‍यांचा हिताचा अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. कर्मचार्‍यांचा सर्वात महत्वाचा प्रथम प्रश्‍न म्हणजे सन २०१० पासून स्थगित असलेला महागाई भत्ता प्रचलित दराने पुर्वलक्षी प्रभावाने १०० टक्के अदा करावा, या व इतर मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाबाबत कळविण्यात आले होते. तरी देखील बँक व्यवस्थापनाने कोणताही निर्णय न घेतल्याने ११ मार्चपासून मुख्यालयासह सर्व ६४ शाखांवरील कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत, असे कळविण्यात आले आहे.

२००७ मध्ये न्यायालयाने डीए देण्याबाबत निकालही दिला होता. मात्र, या निकालाकडे बँक प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अडीच ते ३ कोटी रूपये डीए जिल्ह्यातील कर्मचार्‍यांचा थकीत आहे. तसेच बीड, औरंगाबाद, परभणी येथील शाखेतील कर्मचार्‍यांना डीए मिळत असून, केवळ जालना जिल्ह्यातील कर्मचार्‍यांवरच अन्याय होत आहे.

हेही वाचा-संजय ताकतोडेच्या जलसमाधीकडे सरकारचे दुर्लक्ष; लहुजी शक्ती सेनेचे आंदोलन


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES