• A
  • A
  • A
खोतकरांच्या नसानसात शिवसेना; ते कदापी काँग्रेसमध्ये जाणार नाहीत, सुभाष देशमुखांचा दावा

जालना - सहकारमंत्री सुभाष देशमुखांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आज राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात बंद दाराआड चर्चाही झाली. ही चर्चा सकारात्मक झाली असल्याचे देशमुख म्हणाले. तसेच खोतकरांच्या नसानसात शिवसेना असून ते कदापी काँग्रेसणध्ये जाणार नसल्याचा दावा देशमुखांनी केला. दानवे आणि खोतकर यांच्यात दिलजमाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


गेल्या बऱ्याच दिवसांपासून खोतकर आणि दानवे हे ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले. अर्जून खोतकर जालन्यातून लोकसभा लढवण्यास इच्छूक आहेत. नुकतेच त्यांनी काँग्रसेचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार अब्दुल सत्तार यांचीही गळाभेट घेतली होती.

हेही वाचा - वेळ आल्यावर चोट्टे म्हणणाऱ्यांचे कान धरू, खोतकरांचा दानवेंना टोला

अर्जुन खोतकर हे जालन्यातून उभे राहण्याच्या हालचालिंना वेग आला आहे. याच पार्श्वभमीवर आज सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि रावसाहेब दानवेंनी खोतकरांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. आता दानवे आणि खोतकर यांच्यात दिलजमाई होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - मोदींनी 'एनजीओ'चा हिशोब मागितल्यामुळे डावे संतापले - डॉ. सच्चिदानंद शेवडेकोणताही वाद नाही चर्चा सकारात्मक - दानवे

आमच्यात कोणताही वाद नसून चर्चा सकारात्मक झाली असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

उद्धव ठाकरे अंतिंम निर्णय घेतील - खोतकर

शिनसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझ्याबाबत अंतिम निर्णय घेतील असे वक्तव्य राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे चर्चा करुन माझ्या बाबतीत सविस्तर चर्चा करतील असेही ते म्हणाले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES